गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (15:41 IST)

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर औरंगाबादमध्ये 21 जण पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत दुसरीकडे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. यातच औरंगाबादमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर ही आतापर्यंत औरंगाबादमध्ये 21 जण पॉझिटिव्ह आले आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर ही सगळी लोक पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना फारशी लक्षणे नाहीत.
 
पहिला डोस झाल्यानंतर काळजी घेण्याची तितकीच गरज आहे असे प्रशासनाने सांगितलं आहे. दुसरीकडे लोकांच्या निष्काळजीपणामुळे हा धक्कादायक प्रकार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रंगाबाद शहरात अंशतः लोक डाऊन प्रशासनाने लावला आहे त्याचाच भाग म्हणून शनिवार आणि रविवार कडक  लॉकडाऊन करण्यात आलेला आहे.