मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (20:59 IST)

काय सांगता, औरंगाबादमध्ये सोमवार पासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता

सध्या कोरोनाचा उद्रेग महाराष्ट्रात वाढत असल्याने महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे लॉक डाऊन लावण्याची स्थिती आली असून येत्या सोमवार पासून पुन्हा लॉक डाऊन लागणार आहे. हे लॉक डाऊन दहा दिवसांसाठी असणार आहे. असे संकेत औरंगाबादच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
 
औरंगाबाद मध्ये देखील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासना समोर हे मोठे आव्हानच आहे. या कोरोनाच्या रुग्णात वाढ होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला प्रशासना कडून वारंवार दिला जात आहे.तसेच कोरोनाबाबत नियमाचे पालन करावे असे देखील नागरिकांना सांगण्यात येत आहे. सध्या औरंगाबादला रात्रीची संचार बंदी लागू केली आहे. ही संचार बंदी प्रशासन ने 7 मार्च पर्यंत लागू केली आहे.असे करून देखील कोरोनारुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.   
 
महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की रूग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली तर आम्हाला लॉक डाऊन लावण्याचा विचार करावा लागेल.या साठी प्राशासनिक अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. हे लॉक डाऊन 8 ते 10 मार्च पासून सुरू होऊन 18 किंवा 20 मार्च पर्यंत असण्याची शक्यता वर्तली जात आहे.