मुख्यमंत्री ठाकरे यांचे भराडी मातेला वंदन, कोकणच्या विकासाची दिली ग्वाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली. आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांना धन्यवादही दिले. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद भराडी देवीकडे मागतांना मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापूरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी ता. मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे ता. कणकवली जि. सिंधुदूर्ग या योजनांचे ऑनलाईन भुमीपुजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.