सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (16:23 IST)

कोरोनामुळे मनसेचा वर्धापनदिन सोहळा रद्द

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वर्धापनदिन सोहळा रद्द केला असला तरी राज्यभरात 9 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहितीही मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्याऐवजी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.