शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (22:17 IST)

मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विट

मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विट MNS president Raj Thackeray's tweet on the occasion of Marathi Rajbhasha Day  raj thackeray tweet on the marathi rajbhasha din kusumagraj maharashtra news in marathi webdunia
मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. तर सोबत एक पत्रही लिहीलं आहे. भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे...'. कुसुमाग्रजांना स्मरून 'मराठी भाषा दिना'निमित्त महाराष्ट्राला विनम्र आवाहन. असं ट्विट त्यांनी केलं आहे. 
 
कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी आपण सारे जण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो. सरकारी कॅलेंडरमधले अनेक दिवस निरसपणे साजरे होतात, तसाच हा दिवसही व्हायचा. पण मनसेनं हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला. आणि अर्थातच ह्या गोष्टीचा अभिमान आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
 
तसेच स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, हिंदू संघटक होतेच पण कमालीचे विज्ञाननिष्ठ आणि क्रियाशील धर्मसुधारक आणि समाजसुधारक देखील असल्याचं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. त्याचसोबत स्वातंत्र्य आणि सुराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या स्मृतीस मनसेचं अभिवादन असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.