इंग्रजी शिकण्याची सोपी पध्दत
ND |
भाषा शिकण्याचे वातावरण-
इंग्रजी भाषा आपली मातृभाषा अथवा बोलीभाषा नाही. त्यामुळे ती आत्मसात करण्यासाठी मातृभाषा शिकण्याचे वातावरण मिळू शकत नाही. मात्र, काही प्रमाणात तरी तसे वातावरण निर्माण करता येते. दहावीपर्यंत मातृभाषेचा पाया पक्का झाल्यानंतर आणि इंग्रजीची चांगली ओळख करून घेतल्यानंतर पुढची पायरी म्हणजे अशा कॉलेजची निवड केली पाहिजे की, तेथे सगळे विषय इंग्रजी भाषेत शिकवले जातात. त्यामुळे इंग्रजी भाषा कानावर वारंवार पडेल. शाळेत येण्यापूर्वी टीव्हीवर इंग्रजी भाषेतील कार्यक्रम अधिकाधिक बघावे किंवा ऐकावे.
याच प्रकारे रेडियोवर इंग्रजी बातम्या व इंग्रजी भाषेतील कार्यक्रम ऐकावे. कुठलीही भाषा शिकायची असल्यास ती जास्तीत जास्त ऐकणे, ही भाषा शिकण्याची पहिली पायरी आहे. मराठी बातम्या, त्यानंतर हिंदी समाचार व त्यानंतर इंग्रजी न्यूज दूरदर्शनवर येत असतात. त्यामुळे इंग्रजी भाषा समजण्यास सोपी जाते.
