फिलिपाईन्स डायरी 1

manila
PR
हाय,
'एचबीओ'वर 'द फ्रीडम रायटर्स' म्हणून चित्रपट पाहत होतो. एका सरकारी शाळेत शिकवणारी शिक्षिका आणि वांशिक विविधता असणार्‍या तिच्या विद्यार्थ्यांना शिकवताना तिने केलेले विविध प्रयोग असा चित्रपटाचा विषय होता. चित्रपटाने मला खिळवून ठेवले. गरमागरम चहाचा कप घेऊन मी जो बसलो तो चित्रपट संपेपर्यंत जागचा हाललो नाही. नवीन काही बघितलं की मित्रांशी गप्पा मारत ते शेअर करायचं ही माझी सवय. पण मी हा इथे मनिलामध्ये, फिलिपाईन्सच्या राजधानीमध्ये.... घरापासून मित्रांपासून दूर... संवाद साधणार तरी कसा? शेवटी एकदाचा जी मेल वर लॉग इन झालो आणि तुम्हा सर्वांसाठी लिहू लागलो.

'मी मनिलामध्ये केव्हा पोहोचलो?' स्नेहल आणि माधवने, मागच्या आठवड्यात माझा फॉरवर्ड मेल मिळताच विचारलेला प्रश्न. खरं सांगायचं तर मलाही कळले नाही की माझी इथे गच्छंती कशी झाली (गच्छंती - Kicked Out याचे अधिक चांगले भाषांतर होऊ शकत नाही.) आयटी कंपनीत नोकरी स्वीकारताना त्यांनी विचारले होते की थोड्या पूर्वसूचनेवर प्रवास करण्यास तयार असाल का? मी आपला हुरळून जाऊन 'हो' म्हणालो.

manila
PR
तेव्हा माहिती नव्हते की ही छोटी पूर्वसूचना केवळ आठवड्याभराची पण असू शकते. काही वेळा तर ती याहीपेक्षा कमी कालावधीची असू शकते. ज्यांनी असा परदेश प्रवास केलेला नाही त्यांच्या डोक्यात विमान प्रवासाची एक भलतीच फंडू कल्पना असते. धूम-2 मधला रिओ डि जानेरोच्या विमानतळावर 'ईष्टाईल' मध्ये चालणारा ऋतिक रोशन. फॅन्सी कपडे, हातात बॅगांचे ओझे नाही... नुसता एक गॉगल वागवत... आपल्या बापाचाच विमानतळ आहे अशा थाटात फिरणारा हिरो... ओह... नायजेरियाला जाण्यासाठी पहिला विमान प्रवास करेपर्यंत माझ्याही डोक्यात तसेच काही खूळ होते.

असल्या लांबच्या प्रवासासाठी तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांनी मानसिक तयारी करण्यासाठी वेळ लागतो. आणि तुम्ही एकटेच प्रवास करणार असाल तर अजूनच जास्त वेळ..... सामानाची बांधाबांध ही अजून एक डोकेदुखी... तिथे गेल्यावर लगेचच लागू शकेल असा शिधा, कपडे, शूज, रोजची प्रसाधने आणि हे सगळे त्या वीस किलोंच्या मर्यादेत बसवायचे... माझ्या वारंवार झालेल्या बदल्यांमुळे अश्विनीला सामानाच्या पॅकिंगचा पुरेपूर अनुभव आहे. त्यामुळे मला चिंता नव्हती.

मुंबई विमानतळावर उंडारत असताना मला मकरंद देशपांडे दिसला. 'स्वदेस' मध्ये शाहरुख बरोबर 'यू ही चला... ' गाणे म्हणणारा ट्रक ड्रायव्हर. त्याचे ते फूटभर लांब, पिंजारलेले केस पाहून तो कायम सेंटरशॉक च्युईंग गम खातो का? असे विचारण्याचा मोह मला झाला खरा, पण मी तो आवरला. तो माणूस लाऊंजमध्ये एक पेय पीत बसला होता. उगाच कशाला त्रास द्या? पण विमानतळावर पहिल्यांदाच एखादी सेलेब्रिटी पाहिली. माझ्या एका सहकार्‍याच्या फ्लाईटमध्ये चक्क प्रियंका चोप्रा होती. म्हणजे ती 'बिझनेस' क्लास मध्ये होती तर ते महाशय 'इकॉनॉमी' सीटवर.... पंख्याच्या बाजूला... अहो तमाम कंपन्यांना आपल्या 'कामगार' वर्गासाठी स्वस्तात स्वस्त सीटस परवडतात. असो... मी मात्र 'मकरंद'चे दर्शन घेण्याइतकाच नशीबवान होतो. नंतर तो आमच्याच बँकॉकला जाणार्‍या विमानात चढला.

रात्री कणभरही झोप झालेली नसेल तर बँकॉक विमानतळावर चार तासाचा हॉल्ट ही अगदी तापदायक कल्पना आहे. 'इकॉनॉमी' क्लासची आसने अगदीच बापुडवाणी असतात. आरामदायी असण्यापेक्षा 'बूड टेकणे' एवढाच त्यांच्या जीवन हेतू असतो. कसे तरी चार तास घालवून मनिलाकडे जाणाऱ्या विमानात बसलो.

manila
PR
एअरपोर्ट समोरंच असणार्‍या टॅक्सी सर्व्हिसबद्दल मित्रांनी सांगितले होतेच. 'तुमचं राहू द्या, माझं राहू द्या' अशी भारतीय पद्धतीने घासाघीस करून टॅक्सी ठरवली. त्या टॅक्सीचे पैसे जरी कंपनी देणार असली तरी उगाच जादा पैसे देणं माझ्या मध्यमवर्गीय मनाला पटेना. 'मनिला' शहराबद्दल माझं प्रथमदर्शनी मत चांगलं झालं. मुंबईसारखीच दमट हवा, पण मुंबईपेक्षा स्वच्छ आणि नीटनेटकं शहर .. या शहर आणि देशाबद्दल मात्र पुढच्या डायर्‍यांमध्ये... नायजेरिया डायरीचा पहिला भाग 'ई सकाळ' वर प्रसिद्ध झाल्यानंतर... नायजेरियाला चांगले का म्हटले म्हणून एका वाचकाने बरीच आदळआपट करणारा मेल पाठवला होता.....

असो..... अजूनही मी छापण्यासाठी नव्हे तर माझ्या मित्रांशी संवाद साधण्यासाठीच लिहीत आहे.

- चारू वाक ( अनुवादित)
वेबदुनिया|

[email protected]m


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...