शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ओळख खेळाडूंची
Written By वेबदुनिया|

गीत सेठी

नाव : गीत सेठी
जन्म : १७ एप्रिल १९६१
ठिकाण : नवी दिल्ली
देश : भारत
खेळ : बिलियर्डस

बिलियर्ड खेळात वर्चस्व गाजविणारा गीत सेठी. १९८५ व १९८७ साली हौशी जागतिक बिलियर्डस स्पर्धा जिंकून गीत सेठीने बिलियर्डच्या विश्वात आपला ठसा उमटवला. त्याने या स्पर्धेत विक्रमी १४७ ब्रेक मिळवले होते. त्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉड्समध्ये नोंदवले गेले.

१९८५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकवले. त्यानंतर त्याने १९८८ पर्यंत ते टिकवले. १९८७ मध्ये त्याने आशियाई बिलियर्ड स्पर्धेतही विजेतेपद पटकवले. त्यानंतर १९९२ मध्ये झालेल्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत त्याने विक्रमी १२७६ ब्रेक मिळवले.

१९९३, १९९५, १९९८, २००१ व २००६ साली झालेल्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत विजेतेपद पटकविले. १९८७ मध्ये झालेल्या तेराव्या आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकवले. त्याने सक्सेस व्हर्सेस जॉय नावाचे पुस्तकही लिहिले आहे.

पुरस्कार
१९८६ : अर्जुन पुरस्कार
१९८६ : पद्मश्री
१९९२-९३ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
१९९३ : के के बिर्ला पुरस्कार