शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ओळख खेळाडूंची
Written By वेबदुनिया|

पी.टी.उषा

नाव : पिल्लावूलकाडी थेक्कापारामबील उषा
जन्म :२७ जून १९६४
ठिकाण : कुथ्थाली, केरळ
देश : भारत
खेळ : धावपटू
पदार्पण : १९७९

भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी धावपटू म्हणजे पी. टी. उषा. केरळमधील कुथ्थाली येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या पी. टी. उषाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. नंतर तिने महिलांच्या क्रीडा महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१९७६ मध्ये तिने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तिचा खेळ ओ. एम नांबियार यांनी पाहिला. त्यांना या मुलीमध्ये काही तरी चमक दिसली. पुढे त्यांनीच तिला मार्गदर्शन केले. १९८० मध्ये तिने प्रथम ऑलंपिकमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रँकसूटमध्ये धावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

१९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य पदके जिंकली. तर १९८३ मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड चँपियन्स स्पर्धेत तिने ४०० मीटर स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तो विक्रम १०८९ पर्यंत अबाधित होता.

उषाने एटीएफमध्ये जवळपास १३ सुवर्णपदके पटकावली आहेत. १९८४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अडथळ्यांच्या शर्यतीत तिचे कास्य पद्क एक शतांश सेकंदाने हुकले. १९८६ मध्ये सोल येथे झालेल्या दहाव्या आशियाई स्पर्धेत तिने ४ सुवर्ण व १ रौप्यपदक जिंकले. तिने आपल्या कारकिर्दीत १०० हून जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

पुरस्कार
१९८४ : अर्जुन पुरस्कार
१९८४ : पद्मश्री
१९८५ : सर्वोत्तम महिला अ‍ॅथलिट
१९८४ ते १९८७ व १९८९ : सर्वोत्तम आशियाई खेळाडू
१९८४, ८५, ८९ व ९० : सर्वोत्तम रेल्वे खेळाडूसाठीचा मार्शल टिटो पुरस्कार
१९८६ : आदिदास गोल्डन शू अवॉर्ड (सर्वोत्तम अ‍ॅथलिट) सोल आशियाई खेळ
१९९९ : केरळचा सर्वोत्तम क्रीडा पत्रकाराचा पुरस्कार
१९९९ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार