शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ओळख खेळाडूंची
Written By वेबदुनिया|

मिल्खा सिंग

पूर्ण नाव : मिल्खा सिंग
जन्म : ०८ ऑक्टोबर १९३५
ठिकाण : फैसलाबाद
देश : भारत
खेळ : धावपटू

'फ्लाईंग शीख' या टोपण नावाने ओळखला जाणारा धावपटू मिल्खा सिंग. रोम येथे झालेल्या १९६० व टोकियोतील १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

पतियाळा येथे १९५६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षांनी झालेल्या स्पर्धेत त्याने २०० व ४०० मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली.

१९५८ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्याने आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.

सहा सप्टेंबर १९६० ला ऑलिम्पिकमध्ये त्याने चारशे मीटर शर्यतीत त्याने आपला मागच्या वर्षीचा विक्रम मोजला. त्या शर्यतीत तो चौथा आला. ०.१ सेकंदाने त्याचे कास्य पदक हुकले होते. त्या स्पर्धेत तो कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावला होता.

त्याआधी त्याने १९५८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर शर्यतीही सुवर्णपदक जिंकले होते.

मिल्खा सिंग हा असा धावपटू होता की त्याने कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर त्याने ४५.९ सेकंदात पार केले. त्याचा विक्रम अजूनही कोणत्यही भारतीयाला मोडता आलेला नाही.

त्या काळात मिल्खा सिंग देशभरातील तरूणांचा आदर्श होता. त्याने जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्याने विक्रम मोडला ते बूट त्याने राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचा मुलगा ‍जीव सिंग हा प्रसिध्द गोल्फपटू आहे.