शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ओळख खेळाडूंची
Written By वेबदुनिया|

लिएंडर पेस

नाव : लिएंडर अ‍ॅड्रीन पेस
जन्म : १७ जून १९७३
ठिकाण : गोवा
देश : भारत
खेळ : टेनिसपटू

टेनिस विश्वात भारताचे नाव जगभर कोणी नेले असेल तर तो आहे लिएंडर पेसने. त्याचा जन्मच खेळाडूंच्या घराण्यात झाला. त्याची आई जेनिफर पेस ही नावाजलेली बास्केटबॉलपटू व भारतीय महिला बास्केटबॉल संघाची कर्णधार होती. तिने १९८० मध्ये आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तर त्याचे वडील व्हेस पेस हॉकीपटू होते. १९७२ च्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीत कांस्य पद्क मिळवणारया संघात ते होते.

१९८५ मध्ये त्याने चेन्नईतील ब्रिटानिया टेनिस अ‍ॅकॅडमीत प्रवेश केला. १९९० मध्ये त्याने ज्युनियर विम्बल्डन स्पर्धा जिंकली. व सर्वांच्या नजरेस आला. तेव्हा तो कनिष्ठ गटात अव्वल क्रमांकावर होता. १९९६ मध्ये त्याने अथेन्स ऑललिम्पिकमध्ये पुरूष एकेरीत कांस्य पदक जिंकले.

एकेरीपेक्षा दुहेरीत त्याची कामगिरी सरस होत आहे. ‍महेश भूप‍तीबरोबर त्याची जोडी जमली व त्यांनी अनेक सामने जिंकले. एकेकाळी त्यानी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही पटकवले १९९९ व २००१ ची फ्रेंच खुली स्पर्धा व १९९९ मध्ये विम्बल्डन खुली स्पर्धा महेश भूपतीच्य साथीने जिंकली. १९९९ मध्ये रशियाच्या लिसा रेमंडबरोबर त्याने विम्बल्डनमध्ये मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकवले

पुढे २००३ मध्ये मार्टिना नवरातिलोव्हाबरोबर त्याने विम्बल्डन व ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकली. २००६ मध्ये झेक प्रजासत्ताकच्या मार्टिन डॅम बरोबर खेळताना तो ऑस्ट्रलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. तर डॅ बरोबर त्याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकवले होते.

२००६ मध्ये झालेल्या दोहा आशियाई स्पर्धेत त्याने महेश भूपतीबरोबर खेळताना पुरूष दुहेरीत व सानिया मिर्झाबरोबर खेळताना मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. तर डॅमबरोबर खेळताना जानेवारी २००७ मध्ये त्याने विजेतेपद पटकवले आहे.

पुरस्का
१९९६-९७ : राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
२००१ : पद्मश्री