सानियाची नजर ओलिंपिक पदकावर
|
|
|
कधी आपल्या पेहरावामुळे तर कधी केशरचनेमुळे नेहमी चर्चेत रहाणार्या सानियासाठी हे वर्ष खुप छान राहिले. 15 नोव्हेंबर1986 त मुंबईत जन्मलेली सानिया ग्रँड स्लैम टूर्नामेंट मधये वरिष्ठता प्रात्प करणारी सानिया पहिली भारतीय खेळाडू आहे. सानिया रिकाम्या वेळेत जाहिरातींच्या शुटींगमध्ये व्यस्त असते. ती चित्रपटात आगमन करत आहे यावरही चर्चा रंगली. या वर्षी तीने खुप उच्चतम खेळाडूंना हरविले आहे. यात मार्टिना हिंगीस, दिनारा साफिना, पैटी श्नाइडर व सहर पीर सामिल आहेत.
|
दुहेरी खेळात सानियाचा खेळ खुप छान झाला. तिला वाटते यामुळे तिच्या एकेरी प्रदर्शनावर फरक पडला. व या अनुभवातून ती बरेच काही शिकली. खाण्यात बिर्याणी आवडणारी सानिया या वर्षी 27व्या स्थानावर पोहोचली. या आधी 2005 मध्ये ती अमेरीका ओपनच्या चवथ्या फेरीत पोहचली होती. व इथवर पोहचणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. डिसेंबरमध्ये होणार्या होपमैन कपच्या स्पर्धेत ती रोहन बोपन्ना सोबत भारताचे प्रतिनिधीत्त्व करेल. या जोडीला सातवे स्थान दिले गेले आहे. या स्टार खेळाडूसाठी तिचे जखमी होणे ही मोठी समस्या असते. जखमी असल्या कारणाने तीला खुपदा महत्त्वपूर्ण टूर्नामेंटला मुकावे लागते.
