शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (19:35 IST)

UGC NET परीक्षेच्या तयारीसाठी काही सूचनांचे अनुसरणं करा, यश मिळेल

अनेकदा उमेदवाराला परीक्षेची चांगली तयारी करून देखील नेट ची परीक्षा उत्तीर्ण करता येत नाही त्याचे कारण त्यांना परीक्षेची तयारी करण्याच्या योग्य मार्ग माहीत नसतो अशा परिस्थितीत उमेदवारांसाठी काही सोप्या टिप्स सांगत आहोत.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 पुनरावृत्तीवर लक्ष केंद्रित करा -
अनेक उमेदवारांनी अभ्यासक्रम पूर्ण केले असणार. त्यांना आता पुनरावृत्ती कडे लक्ष दिले पाहिजे. प्रारंभापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक अध्याय आणि त्यातील विषयाची पुनरावृत्ती करा. एक रणनीती तयार करा की एका दिवसात आपल्याला हा धडा आणि या विषयाचा अभ्यास पूर्ण करायचा आहे.जर पुनरावृत्ती चांगली असेल तर परीक्षेच्या वेळी काहीच विसरणार नाही.
 
2 कमकुवत विषयांवर अधिक लक्ष द्या-
पुनरावृत्ती नंतर देखील आपण एखादे विषय विसरत असाल तर त्या विषयावर लक्ष केंद्रित करा.असं केले नाही तर परीक्षेमध्ये आपल्याला अडचण येऊ शकते.कमकुवत असणाऱ्या विषयांची चांगली तयारी करा जेणे करून परीक्षे दरम्यान आपल्याला काहीच त्रास होणार नाही. 
 
3 मागील 5 वर्षाचे पेपर सोडवा-
प्रत्येक परीक्षेत मागील 5 वर्षाचे पेपर उपयुक्त ठरतात, म्हणून यूजीसी नेटशी शेवटची 5 वर्षे घ्या आणि दर 2 दिवसांनी 1 पेपर सोडवा.हे आपल्या अभ्यासात सुधारणा आणतील. या मुळे आपल्या अभ्यासाची पुनरावृत्ती होईल आणि बरेच धडे देखील सोडवले जातील. या साठी मागील वर्षाचे पेपर ऑनलाईन डाउनलोड करू शकता.तसेच नेटच्या अभ्यास पुस्तकांमध्ये देखील मागील बाजूस पेपर दिलेले असतात  
 
4   मॉकटेस्टची मदत घ्या -
या परीक्षेच्या तयारीसाठी मॉकटेस्ट सर्वात महत्त्वाची आहे. परीक्षेपूर्वी 6 -6 मॉकटेस्ट घ्या,मॉकटेस्ट ही परीक्षेसारखी असते आणि ती दिल्याने तयारीची चाचणी होईल, परीक्षेच्या पॅटर्नचे ज्ञान देखील मिळते.
 
5 कोणताही दबाब घेऊ नका-  
परीक्षा म्हटली की दबाव किंवा ताण येतोच. हा दाब टाळावे दबावाच्या किंवा तणावाच्या खाली येऊन चुकून परीक्षेला बळी पडू शकता. असं होऊ देऊ नका. शांत मनाने परीक्षेला जा आणि मनाला शांत ठेवून परीक्षा द्या यश नक्कीच मिळेल.