बुधवार, 21 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (08:27 IST)

एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करण्यास या तारखेच्या ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी ) नं राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा २०२१ अंतर्गत ३९० पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. ३९० पदांसाठी २ जानेवारी २०२२ ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.
 
एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता अर्ज सादर करण्यास दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी २३:५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एकूण २० संवर्गातील ३९० पदांची जाहिरात आली आहे. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात येईल.
 
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक ७,८ व ९ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात येईल. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास ५ ऑक्टोबर दुपारी २ पासून प्रारंभ झाला आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५४४ तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी ३४४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
 
पदांचा तपशील
उपजजिल्हाधिकारी १२, पोलीस उपअधीक्षक १६, सहकार राज्य कर आयुक्त १६, गटविकास अधिकारी १५, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, उद्योग उप संचालक ४, सहायक कामगार आयुक्त २२, उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी ३९, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, सहायक गटविकास अधिकारी १७, सहायक निबंधक सहकारी संस्था १८, उपअधीक्षक भूमि अभिलेख १५, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर १, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १, सहकारी कामगार अधिकारी ५४, मुख्याधिकारी गट ब ७५, मुख्याधिकारी गट अ १५ पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ १० पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.