1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (16:25 IST)

डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक आहे नीटची परीक्षा, अशी करा तयारी

नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रेंस टेस्ट. ही परीक्षा देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. 12 वी च्या नंतर आपल्याला देखील डॉक्टर व्हायचे असल्यास आणि त्या संदर्भात MBBS किंवा BDS चा अभ्यास करावयाचा असल्यास आपल्याला ही नीटची परीक्षा द्यावीच लागणार. 
 
आम्ही सांगू इच्छितो की नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (NTA) प्रत्येक वर्षी ही प्रवेश परीक्षा घेत असते. 
 
नीटच्या परीक्षेच्या पात्रतेबद्दल बोलताना बारावीत फिजिक्स,केमेस्ट्री आणि बायोलॉजी विषयांसह किमान 50 टक्के गुण असणं अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त, अर्जदाराचे वय किमान 17 वर्ष असणे आवश्यक आहे. 
 
हे जाणून घ्या की जर आपण 12 वी चा अभ्यास चांगल्या प्रकारे केला असेल, विशेषतः फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये, तर आपण या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकता, पण लक्षात ठेवण्या सारखे म्हणजे की राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी ही एकमेव वैद्यकीय चाचणी आहे. त्यासाठी स्पर्धा अवघड असते. परीक्षा उत्तीर्ण करणे तर कठीण आहे पण अशक्य काहीच नाही.
 
परीक्षेच्या माध्यमांविषयी बोलावं तर हिंदी आणि इंग्रेजी मध्ये प्रश्न दिले जातात. जर आपण ही परीक्षा उत्तीर्ण करता तर काउंसलिंग केली जाते आणि राष्ट्रीय स्तरा व्यतिरिक्त राज्य स्तरावर देखील त्याची काउंसलिंग केली जाते. या मध्ये वेगवेगळ्या प्रवर्गानुसार जागेचे वाटप केले जाते. 
 
एनटीए च्या अधिकृत संकेत स्थळ nta.ac.in वर आपल्याला बरीच माहिती मिळेल. या सह आपण मॉक टेस्ट पेपर देखील डाउनलोड करू शकता आणि त्यानुसार आपल्या तयारीला अजून जोमानं सुरू करू शकता.
 
करिअर तज्ज्ञ तयारी साठीचा सल्ला देतात की आपल्याला या परीक्षेसाठी पूर्वी पासून लक्ष द्यावयाचे असतात. ज्या स्तरावरची ही परीक्षा आहे त्याला बघून आपल्याला शेवटचे 2 महिने अचूकपणे पुनरावृत्ती करावी लागणार. या साठी न केवळ आपल्याला तणाव घेण्यापासून वाचायचे आहे तर उत्तम तयारीसाठी वेळापत्रक तयार करून वेगवेगळ्या विषयांकडे देखील लक्ष द्यावयाचे आहे.
 
लक्षात असावे ! की ही साधीसुधी परीक्षा नसून आपण वेगवेगळया तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यास अजिबात संकोच करू नका. आपल्याला मागील वर्षाच्या टॉपर्सची मुलाखत देखील मिळेल, ज्याला आपण ऐकू वाचू शकता. अशा प्रकारे जे इतर तज्ज्ञ आहे त्यांचा सल्ला देखील आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेवटी आपली शिस्त आणि उत्कृष्ट पुनरावृत्तीसह शक्य असेल तेवढ्या वेळा मॉक टेस्ट पेपर सोडविणे आपल्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतं. कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन या साठी फायदेशीर ठरले आहे. या साठी आपल्याला NCERT च्या पुस्तकांचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
 
शेवटी आपल्याला आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमाकडे लक्ष द्यावयाचे आहे आणि निवडकच धडांचा अभ्यास करणं टाळायचे आहे. आपल्याला संपूर्ण कोर्सचा अधिकाधिक भाग कमीतकमी वेळात व्यापण्याचा प्रयत्न करावा. लक्षात असू द्या की या परीक्षे साठी कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट घेऊन चालणार नाही. आपले कठोर परिश्रमच आपल्याला चांगले परिणाम आणि यश मिळवून देऊ शकतात.