suvichar

सब इंस्पेक्टरची तयारी कशी करावी जाणून घ्या

Updated: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (10:08 IST)
 
* सब इन्स्पेक्टर कसे बनावे पात्रता काय असावी -
या परीक्षे मध्ये बसण्यासाठी सर्वप्रथम त्यांना राज्य सरकारद्वारे घेण्यात येणाऱ्या सब इन्सपेक्टरच्या भरती साठी अर्ज करावे लागेल. तरच ते SI च्या परीक्षेत भाग घेऊ शकतात. या साठी उमेदवाराला सब इन्सपेक्टर साठी खालील दिलेली पात्रता असणे आवश्यक आहे.  

या परीक्षेत भाग घेण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच उमेदवार एस आई च्या परीक्षेत भाग घेऊ शकतात. जर आपण कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी घेतली नसेल तर आपण ह्या परीक्षेत सहभागी होऊ शकत नाही. 
 
* सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा -
या परीक्षेत भाग घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय वर्षे 28 असणे आवश्यक आहे. 
एससी / एसटी उमेदवार वयोमर्यादा - सब इन्स्पेक्टर परीक्षेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वयोगटातील उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.ओबीसी उमेदवार वयोमर्यादा - सब इन्स्पेक्टर परीक्षेत ओबीसी उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
 
*  सब इन्सपेक्टर परीक्षेसाठीचे अभ्यासक्रम -
SI च्या परीक्षेत भाग घेण्यापूर्वी या परीक्षेचे अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना बद्दल ची माहिती असावी कारण या अभ्यासक्रमावर आधारे प्रश्नच परीक्षेत विचारले जातात आणि या अभ्यासक्रमाच्या आधारेच सब इन्सपेक्टर परीक्षे ची तयारी करावयाची असते. 
आपल्याला SI चे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अभ्यासक्रमाची माहिती मिळवायची असेल तर आम्ही देत आहोत जाणून घ्या.

* टेक्निकल  किंवा तांत्रिक साठी -
या मध्ये 100 गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना सोडविण्यासाठी 2 तासाचा वेळ देण्यात येतो आणि या मध्ये कोणत्याही प्रकाराची निगेटिव्ह मार्किंग केली जात नाही.
भौतिकशास्त्र - 33 गुण
रसायनशास्त्र - 33 गुण
गणित - 34 गुण

* नॉन टेक्निकल किंवा विना तांत्रिक-
या मध्ये 200 गुणांकाचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाते ज्यांना सोडविण्यासाठी 3 तासाचा वेळ देण्यात येतो आणि या मध्ये कोणत्याही प्रकाराची निगेटिव्ह मार्किंग केली जात नाही.
हिंदी - 70 गुण
इंग्रजी - 30 गुण
सामान्य ज्ञान - 100 गुण
 
* सब इन्स्पेक्टर लेखी परीक्षा -
सर्वप्रथम उमेदवाराला SI ची परीक्षा देण्यासाठी बोलविले जाते आणि उमेदवाराने लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पुढील प्रक्रियेसाठी बोलवतात.
 
* कागद्पत्रक तपासणी -
जेव्हा उमेदवार सब इन्सपेक्टर ची परीक्षा उत्तीर्ण करतात त्या नंतर उमेदवाराला कागदपत्रे पडताळणी करण्यास बोलवतात.
 
* शारीरिक कार्यक्षमता चाचणी -
कागदपत्रे पडताळणी केल्यावर उमेदवाराला शारीरिक कार्यक्षमता चाचणी साठी बोलविले जाते.जे उमेदवार या चाचणीत उत्तीर्ण होतात त्यांना सब इन्सपेक्टर च्या ट्रेनिंग साठी पाठविले जाते. प्रत्येक राज्यात स्त्री आणि पुरुषांसाठी कार्य क्षमता वेगळी असते.
 
पुरुष उमेदवारांसाठी -
उंची - 167.5 सेमी
छाती - 81-86 सेमी
 
महिला उमेदवारांसाठी 
उंची - 152.4 सेमी
छाती - एन / ए
 
* सब इन्सपेक्टर चा पगार किती असतो ?
प्रत्येक राज्यात सब इन्सपेक्टर चा पगार वेग वेगळा असतो भारतात सब इन्सपेक्टर चा सरासरी पगार सर्व भत्ते मिळून सुमारे दरमहा 42,055 रुपये असतो.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments