बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रपती निवडणूक
Written By
Last Updated : मंगळवार, 28 जून 2022 (13:27 IST)

शरद पवार राष्ट्रपती होणार नाहीत कारण...

"सर्व पक्षांनी एकमताने राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांचं नाव घेतलं. ते या प्रस्तावाला राजी झाले असते तर प्रश्नच नव्हता पण त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक नसल्याचं सांगितलं. ते तयार झाले तर आमचा सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या नावाला असेल. ते तयार नसतील तर सगळे मिळून एक नाव ठरवू. आम्ही शरद पवारांशी चर्चा करू," असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
 
दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लब इथे सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. यानंतर ममता बॅनजी बोलत होत्या.
 
त्या पुढे म्हणाल्या, "आमच्याकडे अनेक वरिष्ठ नेते आहेत. सरबजीत देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे असे अनेक ज्येष्ठ नेते आहेत. या बैठकीला अखिलेश यादव, मुफ्ती मोहम्मद सईद उपस्थित होते. सीपीआय पक्षाचे प्रतिनिधीही होते. शिवसेना, डीएमकेचेही नेते होते.
 
देशात बुलडोझायनेशन सुरू आहे. विविध संघटनांचा राजकीय कारणांसाठी गैरवापर केला जात आहे. म्हणूनच आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे".
 
"प्रत्येक पक्षाने राष्ट्रपतीसंदर्भात आपले विचार व्यक्त केले", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी सांगितलं.
 
"विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपतीपदाचा एकच उमेदवार असेल असा निर्णय संयुक्त आघाडीने घेतला. अनेक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. आम्ही असं ठरवलं की विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपतीपदासाठी एकच उमेदवार असेल. या उमेदवाराला आमचा सगळ्यांचा पाठिंबा असेल. आम्ही एकमेकांशी चर्चा करू. ही एक चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनंतर एकत्र बैठक घेतली, आम्ही पुन्हा मंथन करू", असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.