शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (21:47 IST)

लोणावळ्यात १२०० सरडे, २०० कासवं जप्त

पुणे लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने प्राण्यांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणत दोघांना पकडले आहे. या दोघांकडून तब्बल 279 कासव आणि 1 हजार 200 सरडे जप्त केले आहेत. पकडलेली कासवे व सरडे हे आफ्रिकन जातीचे आहेत. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे.
 
याप्रकरणी तरुणकुमार मोहन (वय 26, चेन्नई) आणि श्रीनिवास कमल (वय 20, तामिळनाडू) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पुणे लोहमार्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना चेन्नई एलटीटी एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून प्राण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही गाडी पुणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर शोध घेतला गेला. यावेळी दोघा संशयितांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या चार ट्रॅव्हल्स बॅगेची तपासणी केली. त्यावेळी 279 कासव, वेगवेगळ्या जातीचे 1207 सरडे आणि 230 मासे जप्त करण्यात आले आहेत.
 
चार पथके तयारकरून येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मंगळवारी पुणे ते लोणावळा दरम्यान चेन्नई एलटीटी एक्सप्रेस गाडीत या दोघांना पकडले आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रे नव्हती. चौकशीत हे सर्व प्राणी त्यांनी चैनई येथून मुंबई येथे घेऊन जाणार असल्याचे सांगितले आहे. काही प्राणी हे विदेशी असून, ते सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ताब्यात या दोघांनाही सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात दिले आहे.
प्राण्यांच्या तस्करीचं मोठं रॅकेट पुण्यात उघडकीस आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत चेन्नई एक्सप्रेसमध्ये 1200 सरडे आणि 200 कासवं जप्त केली आहेत.
 
तरुण कुमार मोहन आणि श्रीनिवास या दोन आरोपींना संबंधित प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपी चेन्नईतून मुंबईला जात आसताना पुणे ते लोणावळ्या दरम्यान दोघांना रेल्वे पोलिसांनी पकडले.
 
सरडे आणि कासवांची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. जंगली प्राणी तसेच त्यांच्या अवयवांची तस्करी देखील होते.
 
इगुआना सरडा आणि अफ्रिकन सल काट कासव तस्करीसाठी थायलंड, बँकॉक या देशांमध्ये विकले जातात.