बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मे 2024 (09:32 IST)

बाईकवरून आलेल्या 2 बदमाषांनी एका व्यक्तीवर झाडल्या गोळ्या

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. बाईकवरून आलेल्या दोन जणांनी दुकानासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहे ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एक घटना घडली आहे. एक व्यक्ती दुकानासमोर उभा होता त्या वेळेला एका बाईकवरून दोन जण आलेत. व काही कळायच्या आताच त्या व्यक्तीवर या बाइकस्वारांनी गोळ्या झाडल्या. परिसरातील नागरिकांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. पण चिकित्सकांनी त्याला मृत घोषित केले.
 
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी मृतव्यक्तीचे शव ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी पुण्यामधील पिंपरी चिंचवडमध्ये सांगावी परिसरात बाईक वरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी 35 वर्षीय दीपक कदम नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. दीपक दुकानावर उभे होते त्यावेळीस त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. 
 
पोलिसांनी सांगितले की गोळी लागल्यानंतर दिपकला रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना संशय आहे की, हा हल्ला जुन्या शत्रुत्वातून करण्यात आला आहे. पोलीस या प्रकारांची चौकशी करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik