suvichar
✕

2 सख्ख्या भावांची जात वेगवेगळी, एक भाऊ कुणबी दुसरा मराठा

Updated: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (16:49 IST)
 
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे या गावात दोन सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. एकाच्या प्रमाणपत्रावर कुणबी तर दुसऱ्या भावाच्या प्रमाणपत्रावर हिंदू मराठा अशी नोंद आढळली आहे. सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर असे अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
 
आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. शाळेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. जना कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर कुणबी आणि त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशी नोंद आहे.
 
कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी तरुणांनी ते जाळून देखील टाकले आहे. मात्र आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्र व्हायरल झाल्याने पुन्हा कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मालेगावच्या १० कोटींच्या सुपारी घोटाळ्याप्रकरणी तुकाराम मुंडे यांनी पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले

हुथींनी येमेनच्या राष्ट्रपती भवनावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला, दोन सुरक्षा कर्मचारी ठार

वर्ध्यात एकाच दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली

बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवलेल्या १९ पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाणार

केवळ १२५ जणांनाच मिळणार Royal Enfield Classic 650 ची नवी लिमिटेड एडिशन; जाणून घ्या किंमत

पुढील लेख
Show comments