पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
महाराष्ट्रातील पुण्यामधील मुंडवा परिसरात एका वस्ती मध्ये एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या लहान चिमुरडीचे आईवडील हातमजूर आहे. तसेच हा 32 वर्षीय आरोपी या चिमुरडीच्या वडिलांचा मित्र असून त्याने या लहान मुलीसोबत सोबत दुष्कर्म केले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी नेहमी पीडितेच्या घरी यायचा जायचा.
तसेच रविवारी या चिमुरडीचे आई वडील घरी नसलेले पाहून या नराधमाने फायदा घेतला व लहान मुलीला घरी नेऊन दुष्कर्म केले. या लहान मुलीने आपल्या आईला घडलेली सर्व घटना सांगितली व व या मुलीच्या आईने आरोपीला जाब विचारला असता आरोपी फरार झाला. त्यानंतर या पीडितेच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली असून पुढील तपास पोलीस अधिकरी करीत आहे.
Edited By- Dhanashri Naik