प्रफुल्ल लोढावर बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
प्रफुल्ल लोढावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकविल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 3 जुलै रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर,14 जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढा याच्यावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलीसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलीसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.”
साकीनाका पोलीसांनी लोढा यांना 5 जुलै रोजी अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लोढा हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप रविवारी (20 जुलै) केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून आता कोथरूड येथे राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद केली आहे.
तिने आरोप केला आहे की, आरोपी लोढा ने पीडितेला तुझ्या पतीला नौकरी लावतो असे सांगून 27 मे 2025 रोजी रात्री आठ वाजता बालेवाडीच्या एका हॉटेलमध्ये बोलावले आणि पतीला नौकरी लावायची असेल तर मला शारीरिक सुख दे.तिने नकार दिल्यावर तिच्या इच्छेच्या विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध बनवले आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने 17 जुलै रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून आरोपीचा ताबा घेतला जाणार आहे.
Edited By - Priya Dixit