गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जानेवारी 2026 (17:51 IST)

निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे अजित पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात भूकंप

Pune Municipal Corporation election
सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली आहे. यंदाच्या महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही एनसीपी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही एनसीपीने युती केल्यांनतर अजित पवारांनी एका मुलाखतीत निवडणूक झाल्यांनतर दोन्ही एनसीपी एकत्र येण्याचा विचार करण्याचे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. 
एका मुलाखतीत ते म्हणाले, राजकीय आयुष्यात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचे किंवा नाही हा निर्णय अद्याप जरी झालेला नसला तरीही या युतीमुळे कार्यकर्त्ये समाधानी आहेत. त्यांच्या या विधानामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादीची भविष्यात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी पुण्यात ही युतीची चर्चा फिसकटली असून आता ही युती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक मैदानात शरद पवार गटाचे बडे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.यावर भाष्य करताना अजित पवारांनी ही रणनीती आहे की अंतर्गत तडजोड, याबाबत सूचक मौन पाळले.अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर तीव्र निशाणा साधला.
 
Edited By - Priya Dixit