1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Auto driver fatally attacked over passenger fare in Pune

पुण्यात प्रवासी भाड्यावरून ऑटोचालकावर जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी

crime
पुण्यातील कात्रज चौक आणि नवले पूल दरम्यान प्रवासी घेण्याच्या वादातून एका रिक्षा चालकाला तिघांनी मारहाण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ऑटोचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुरज काळे असे या जखमी ऑटोचालकाचे नाव आहे. या प्रकरणी तिन्ही ऑटोचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाच्या परिसरात प्रवासी भाडे घेण्यावरून नेहमीच रिक्षा चालकांमध्ये वाद होतात. काल प्रवासी भाड्यावरून सुरज आणि इतर तीन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि तीन रिक्षा चालकांनी सूरजला बेदम मारहाण केली आणि थेट नवले पुलावरून खाली फेकून दिले. 
घटनेनन्तर सुरज गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मध्ये काही रिक्षा चालक एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तपास करून आरोपींवर तातडीने कारवाई केली आणि त्यांना ताब्यात घेतले. 
या प्रकरणी तिन्ही आरोपी रिक्षा चालकांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.  या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
Edited By - Priya Dixit
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
ऑनलाइन फार्मसीविरोधात मोठा निषेध; पुण्यात उद्या १५,००० मेडिकल स्टोअर्स बंद राहणार