बुधवार, 3 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 2 डिसेंबर 2025 (11:24 IST)

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात बसने फूटपाथवर पादचाऱ्यांना चिरडले; २ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने अचानक फूटपाथवर येऊन सहा पादचाऱ्यांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात तो मद्यधुंद असल्याचे दिसून आले आहे.या अपघातामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे, त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात केली आहे.
Edited By- Dhanashri Naik