मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (16:35 IST)

पुण्यात बसचालकाला चपलेने मारहाण

Bus driver beaten with shoes in Pune Pune station area PMPL bus Driver News In Marathi Maharashtra Batmya Pune News In Marathi
पुण्यात दोन तरुणाने पीएमपीएलच्या बस चालकाला चपलेने हाणामारी केल्याची घटना घडली असून  या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर घटना रविवारी पुणे स्टेशन परिसरातील आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी स्वारगेटवरून पीएमपीएलची बस वेगाने पुणे स्टेशन परिसरात आल्यावर दुचाकी चालकामध्ये रस्त्यावरून बाईकने दोन तरुण ओव्हरटेक करून जात असताना त्यांनी बाईक बसच्या पुढे लावली त्यावरून चिडून बसचालकाने त्यांना समोरून जाण्यास सांगितले. तरुणांमध्ये आणि बस चालकांमध्ये एकमेकांची चुका सांगण्यावरून बाचाबाची झाली आणि नंतर या बाचाबाचीचे रूप भांडणात झाले नंतर तरुणांनी बसचालकाची कॉलर धरून त्याला चपलेने हाणायला सुरु केले. बस चालकाला वाचविण्यासाठी बस वाहक देखील मध्ये येऊन दुसऱ्या तरुणाला मारहाण करू लागला. त्यांना मध्यस्थी करण्यासाठी काही प्रवासी मध्ये आले. परंतु ते तरुण कोणालाही जुमानत नव्हते. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलच्या केमेऱ्यात कैद केला असून दोन्ही तरुणांचा चालकाला आणि वाहकाला हाणामारी केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून बंड गार्डन पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार केली असून पोलिसांनी तरुणांना अटक केली आहे. 

Edited By - Priya Dixit