मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (10:42 IST)

मुंबई- पुणे महामार्गावर केमिकलचा टँकर उलटला,वाहतूक ठप्प

Chemical tanker overturns on Mumbai-Pune highway
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली केमिकलचा टँकर पलटी झाला आहे. या टँकर मधून मोठ्या प्रमाणात रसायन रस्त्यावर सोडून त्याचा संपर्क हवेशी आल्याने ते रसायन मेणाप्रमाणे झाले आहे. 
 
सदर केमिकल सांडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून वाहतूक लोणावळा शहरातून हायवेवर वळविली आली आहे. या मुळे लोणावळ्यात वाहतूक कोंडी झाली असून खंडाळा, लोणावळा ते  एक्सप्रेसवे च्या वलवण एक्झिट पॉईंट पर्यंत वाहनाच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत.