1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. College student jumps from metro station in Pune

पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी मारली

delhi metro
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागात एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशन वरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
पिंपरी चिंचवड मधील एका महाविद्यालयाच्या बीसीएस करत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास संत तुकाराम मेट्रो स्टेशन वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
त्याला गंभीर अवस्थेत वाय सीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का घेतले अद्याप हे कळू शकले नाही.
त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो काही आर्थिक समस्येचा सामना करत होताआणि त्याच्या कुटुंबाकडून त्याच्यावर दबाब होता. पोलीस  प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit
 
पुढील लेख
लातूरमध्ये राजकीय वैमनस्यातून झालेल्या हत्याकांडात १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा