जेजुरी-मोरगाव मार्गावर शिवाई बसची दुचाकीला जोरदार धडक; नाझरे येथील दाम्पत्याचा दुर्दैवी अंत
पुणे : राज्यातील विविध भागांत रस्ते अपघातांच्या मालिकेने चिंता वाढवली आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव मार्गावर आज सकाळी शिवाई बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नाझरे येथील पती-पत्नीला आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला. बस आणि दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की, नाझीरकर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे नाझरे गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जेजुरी पोलिसांनी शिवाई बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
ALSO READ: महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी? विदर्भात भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेना ताकद वाढवण्याच्या तयारीत

