रविवार, 6 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 एप्रिल 2025 (18:00 IST)

तनिषा भिसे मृत्यू नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय,इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही

dinanath mangeshkar hospital
social media
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेवर रुग्णालयात दाखल करण्यासाठी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितली. महिलेच्या कुटुंबीयांनी देण्यास अक्षमता दाखवल्यावर महिलेला दाखल करून घेतले नाही तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले तिथे महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. 
हे प्रकरण भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी सोबत घडले असून आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयाचे खरे रूप समोर आणल्यावर राज्यभरातून टीका होत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या  विरोधात टीका होत आहे. मात्र रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. 

आज रुग्णालय प्रशासनाने एक निवेदन जाहीर करत मयत तनिषा भिसे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून रुग्णालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 
घडलेली घटना दुर्देवी असून रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे असले तरी रुग्णालयाकडून मयत रुग्णाच्या प्रति संवेदनशीलता दाखवण्यात आली आहे की नाही याचा तपास आम्ही करत आहो. झालेल्या घटनेबद्दल सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलय परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असेही निवेदनात  म्हटले आहे.

एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले. या सर्व गोष्टी घडल्या हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांमध्ये मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे, असे निवेदनात  म्हटले आहे.
निवेदनात रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, कालच्या घडलेल्या घटनेने आम्ही या पुढे कोणत्याही रुग्णाकडून मग तो प्रसूती विभागाचा असो की लहान मुलांच्या विभागात असणारा रुग्ण असो.त्यांच्याकडून इमर्जन्सी डिपॉझिट रक्कम घेणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. 
Edited By - Priya Dixit