गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (18:28 IST)

पुण्यात मद्यधुंद ट्रक चालकाने कारला धडक दिली, एकाचा मृत्यू

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रकरण समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला एका ट्रक चालकाने एका चारचाकीला धडक दिली या मध्ये ट्रक चालकाने वाहनाला लांबपर्यंत फरफटत नेले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला.तर दोघे जण जखमी झाले.एकाने स्वतःला कारापासून दूर केल्याने सुदैवाने तो वाचला.
 
सदर अपघात पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पुणे- सोलापूर मार्गावर 21 ऑगस्ट रोजी घडला. चौघे मित्र सकाळी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे समाधी मठाच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या गाडीचा अचानक ब्रेक लागला. त्यांनी कडेला वाहन लावत असताना मॅकेनिकची वाट बघत असताना मागून येणाऱ्या कंटेनर ट्रक ने चारचाकीला धडक दिली. त्यामुळे कार पुढं पर्यंत फरफटत गेली.

ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असून त्याला ताब्यात घेत आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहे. हा अपघात सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला यवत पोलिसांनी अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit