दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू
पुण्यामध्ये दापोडी येथे आज म्हणजेच गुरुवारी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अफवा आणि चर्चांना वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचही मृत्यू वेगळे असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्यात थेट संबंध आढळला नाही. काही लोकांनी दारू पिऊन किंवा दारूच्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची चर्चा केली. स्थानिकांनुसार, काहीजण एकत्र दारू पित असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत दोन शवविच्छेदन अहवालात दारूचे अंश आढळले नाहीत.
पोलिसांनी परिसरात अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. पूर्ण शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर अधिक स्पष्टता येईल. ही घटना दुर्दैवी आहे.
Edited By- Dhanashri Naik