1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Grandfather Attempts to Molest Biological Granddaughter

पुण्यात नात्याला काळिमा, आजोबा कडून सक्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी आजोबाला अटक

अजून नसरापूरचे प्रकरण ताजे असता पुण्यातील पर्वती पायथा परिसरातून नात्याला काळिमा  फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात सक्ख्या आजोबानेच आपल्या नऊ वर्षाच्या नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.पोलिसांनी हस्तक्षेप करून आरोपीला जमावाच्या तावडीतून बचाव करत अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पुण्यातील पर्वती पायथा परिसरातील आहे.मात्र मुलीच्या वडिलांनी आपल्याच सक्ख्या नातीवर अतिप्रसंग करण्यासाठी एका निर्जन स्थळी नेले. या वेळी काही स्थानिक नागरिकांना त्याच्या वर्तवणुकीवर संशय आला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी आजोबांचे कृत्य आरडाओरड करून उघडकीस आणले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.आरोपी हा मुलीचा सक्खा आजोबा असल्याचे नागरिकांना समजल्यावर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  
घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरात मोठ्या संख्येने जमावडा झाला आणि आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न करत जनतेच्या ताब्यात देण्याची मागणी होऊ लागली. परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती  नियंत्रणात आणली. आणि नागरिकांना शांतता राखत कायदा हातात न घेण्याचे आवाहन दिले. पोलिसांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून बाहेर काढत त्याला अटक केली असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल कला असून मुलीला वैद्यकीय तपासणीला पाठवले आहे. 
Edited By - Priya Dixit 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
खारघरमध्ये भरधाव डंपरच्या चाकाखाली आल्याने वकिलाचा जागीच मृत्यू