संबंधित माहिती
- मणिपूरात सुरक्षेची हमी नाही, परिस्थिती कठीणच आहे, मोहन भागवतांचे वक्तव्य
- पुण्यात सेल्फी घेताना तरुणी पडली नदीत, तरुणाने तिला वाचवण्यासाठी उडी मारली दोघांचा बुडून मृत्यू
- काँग्रेसने उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली, केले शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन
- पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खेळ सख्ख्या बहिणींनीच संपवला,आरोपींना अटक
- पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना राजकीय नेत्यांवर राग का आला?
पुण्यातील हडपसरात झाडाची फांदी अंगावर पडल्याने डबेवाल्याचा मृत्यू
काळ कधी आणि कुणावर झडप टाकेल हे सांगणे कठीण आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हांडेवाडी येथील आदर्श नगर येथे ट्रकची धडक लागून झाडाची फांदी तुटून एका डबेवाल्याचा डोक्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंडित पाटील असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी महापालिकेच्या घनकचरा वाहून नेणाऱ्या ट्रक चालक उद्यान विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गीता पंडित यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता पंडित यांचे खानावळ आहे. त्यांचे पती पंडित पाटील हे दुचाकीवरून डबे घेऊन सातवनगर येथून जात असताना ट्रक चालकाने फांदीला धडक दिली आणि फांदी पडून मागून येणारे पंडित पाटीलांच्या डोक्यावर पडली. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
Edited by - Priya Dixit
