शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (17:41 IST)

ज्युनिअर अभिनेत्रीवर बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, अमित प्रेमचंद सिटलानी (वय ४०) असं या दिग्दर्शकाचं नाव असून त्याच्याविरोधात पुण्यातील श्रांतवाडी इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सिटलानी हा सन फिल्म्सचा कास्टिंग डायरेक्टर आहे. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यात  ज्युनिअर अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. इतकंच नाहीतर तर अत्याचाराचे व्हिडिओ शूट करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
 
सगळ्यात धक्कादायक म्हणजे १७ वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या दिग्दर्शकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत, अशी तक्रार पीडितेकडून करण्यात आली आहे. या सगळ्यावर आता पोलीस चौकशी करत असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.