बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By

ऑक्सिजन पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल – सौरभ राव

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होत नाही. पुणे जिल्ह्यातील ही परिस्थिती निवारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून येत्या दोन दिवसात ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
 
विभागीय आयुक्त कार्यालयात सौरभ राव यांच्या उपस्थितीत महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका पदाधिकारी, आयुक्त यांची बैठक पार पडली.
 
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्हा व ग्रामीण भागातील रुग्णांवर अत्यावश्यक उपचार करण्यात येत आहे. कोविड संसर्ग रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत याठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, जम्बो हॉस्पिटल, ऑटो क्लस्टर, भोसरी, जिजामाता हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने कोविड रुग्ण उपचार घेत असून याठिकाणी ऑक्सिजनची गरज भासत आहे. बरोबरीने खाजगी रुग्णालयांमध्ये देखील दोन दिवसांपासून आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.