पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल
वडगाव शेरी परिसरात एका पेंटिंग कामगाराचा शिडीवरून पडून मृत्यू झाला. सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमरनाथ भागीरथी भारती (वय 54, रा. उत्तमनगर) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील एका इमारतीत रंगकाम करत असताना अमरनाथ तिथे रंगाचे काम करत असताना शीडीवरून पडून मृत्यु झाला.
शिडीवरून पडल्याने अमरनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अमरनाथ यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सुरक्षिततेच्या उपाययोजनांअभावी हा अपघात झाला.या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करत आहेत.
Edited By - Priya Dixit