मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 22 एप्रिल 2021 (15:33 IST)

रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणारा फार्मासिस्ट अटकेत

कोरोना रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची छापील किमती पेक्षा अधिक किमतीत विक्री करणाऱ्या आणखी एका फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. अंकित विनोद सोळंकी (वय 26, रा.सुखवानी कॉम्प्लेक्स, दापोडी) असे या फार्मासिस्टचे नाव आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अंकित सोळंकी याने खासगी विक्रीसाठी बंदी असतानाही रेमडेसिविर इंजेक्शन जवळ बाळगले होते. स्वतःच्या फायद्यासाठी तो त्याची विक्री चढ्या दराने करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कोंढवा खुर्द येथील जायका हॉटेल जवळून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून रोख 10 हजार आणि दोन इंजेक्शन जप्त करण्यात आली