बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (08:50 IST)

पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा लॅपटॉपची तपासणी करावी : चंद्रकांत पाटील

पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप ताब्यात घेऊन त्याची तपासणी करावी. त्यामधून याप्रकरणाचे बरेच धागेदोरे हाती लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
यावेळी त्यांनी राज्य सरकारने पूजा चव्हाण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हटले. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लक्ष घालावे. त्यांनीच पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. आतापर्यंत या प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लीप्स समोर आल्या आहेत त्याआधारे पोलिसांनी सखोल चौकशी करावी. पोलिसांनी अजूनही पूजा चव्हाणचा लॅपटॉप चेक केलेला नाही. त्याची तपासणी केल्यास बरीच माहिती समोर येईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.