शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (16:04 IST)

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत पूर्वतयारी सुरु - अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोनाविषयक आढावा बैठक पार पडली. या बैठीकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातील कोरोना स्थिती, लसीकरण आणि जागतिक स्तरावर वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्याला संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात इशारा दिला आहे.आढाव बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, जागतिक स्तरावरची माहिती घेतल्यास जगात दररोज ५ ते ६ लाखांच्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सूचना आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण काळजी घेतोय. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत पूर्वतयारी केली जात आहे. 
 
दरम्यान खासगी रुग्णालयातील लसींच्या मुदती संपत आल्याने त्या लसी राज्य सरकार घेण्यासाठी तयार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालायात वापराविना पडून असलेल्या लसी मुदत संपण्याचा आत वापरल्या जाणार आहेत.या लसींबदल्यात खासगी रुग्णालयांना फ्रेश लशींचा साठा राज्य सरकारकडून देण्यात येईल.असंही ते म्हणाले. पावसाळ्य़ात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांचे प्रमाण वाढले आहे.या परिस्थितीवर जिल्हाप्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष असून गरज लागल्यास निर्जंतुकीकरण आणि इतर उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. 
 
य़ावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्यात नव्या व्यक्तीला लसीचा पहिला डोस देण्याऐवजी ज्यांनी पहिला डोस आधीच घेतला आहे. त्यांनात लसी दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करु.तसेच राहिलेल्यांचेही लसीकरण पूर्ण करायचे. बिलं कमी करण्याविषयी कारवाई करत आहोत.असेही अजित पवार म्हणाले.