1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2024 (17:31 IST)

Pune Accident:अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि वडील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत

pune accident
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करत गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले की, दोन्ही आरोपींविरुद्ध तपास सुरू आहे. त्याचा मोबाईल आणि कार जप्त करण्यात आली आहे.

अद्याप सीसीटीव्हीच्या तपशील येणे बाकी असून पुरावे नष्ट करण्यात आरोपींना कोणत्या तिसऱ्या व्यक्तीने मदत केली आणि ती व्यक्ती कोण आहे. पोलीस याचा तपास करत आहे. गुन्हे शाखेने विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली आहे.
 
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केले की, सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात आहे.गाडी आणि मोबाईल देखील आधीपासून आहे. सध्या कोठडीची काहीच गरज नाही. तरीही न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत वाढ केली. 

Edited By - Priya Dixit