1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (19:22 IST)

Pune : आठव्या मजल्यावरून पडून बाप-लेकीचा मृत्यू

death
Pune : इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डक वरून पडून अडीच वर्षांच्या मुलींसह वडिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी 12:30 च्या सुमारास देहूच्या इंद्रायणी नदीच्या जवळ इंद्रायणी वाटिका इमारतीत घडली आहे. रमेश मारुती लगड आणि श्रेया रमेश लगड असे या मयत वडील आणि लेकीचं नाव आहे.    

लगड कुटुंबीय दीड वर्षापासून इंद्रायणी वाटिका इमारतीत राहण्यास आहे. रमेश, त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघे राहत होते. 

रविवारी दुपारी रमेश आपल्या मुलीसोबत खेळत असताना ते आठव्या मजल्यावर  गेले आणि लेकीचा तोल जाऊन ती खाली पडू लागली तिला वाचवण्यासाठी रमेश गेला आणि त्याचा तोल जाऊन ते दोघे खाली पडले. ते दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता  उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. 
पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहे.  
 
Edited by - Priya Dixit