गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (15:48 IST)

Pune Helicopter Crash: पुण्यात मुसळधार पावसात हेलिकॉप्टरला अपघात, त्यात 4 जण होते

Pune helicopter crash: महाराष्ट्राच्या पुण्यात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात खराब हवामानामुळे झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह चार जण होते. सध्या वैमानिक सुखरूप असून, या अपघातात आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
मुंबईहून हैदराबादला जाणारे खासगी हेलिकॉप्टर पुण्यात कोसळले. प्राथमिक माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये एकूण चार प्रवासी होते. खासगी हेलिकॉप्टर अपघाताबाबत पुण्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील पौड गावात हा अपघात झाला. हेलिकॉप्टर खासगी विमान कंपनीच्या मालकीचे आहे. या अपघातात नेमके किती प्रवासी जखमी झाले याची माहिती गोळा करण्यात येत असल्याचे पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.