गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (08:38 IST)

पुणे : शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

water tank
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहराच्या विविध भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागाचा पाणीपुरवठा येत्या  बुधवार आणि गुरुवारी (१५ आणि १६ फेब्रुवारी) बंद राहणार आहे, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या भागात दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नऱ्हे, धायरी, धायरी खंडोबा मंदिर परिसर या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी (१५ फेब्रुवारी) बंद राहणार आहे.
 
बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हाॅटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी, बिबेववाडी, अप्पर आणि सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनंगर, स्टेट बँकनगर, लेक टाऊन परिसर, कोंढवा रस्ता, विद्यासागर काॅलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लाॅट, मार्केटयार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसासह, ससाणेनगर, काळे बोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, आकाशवाणी परिसर, लक्ष्मी काॅलनी, महादेवनगर, मगरपट्टा या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी (१६ फेब्रुवारी) बंद राहणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor