गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 10 जुलै 2023 (13:29 IST)

रुबी हॉल क्लिनिकला केरळच्या परराज्य मंत्री वि. मुरलीधरन यांची भेट

ruby hall
Ruby Hall Clinic in Minister of State for Kerala Vs Muralidharans visit केरळचे परराज्य मंत्री वि. मुरलीधरन यांनी रुबी हॉल क्लिनिकला शुभेच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः परिचारिकांशी संवाद साधला. आरोग्य व्यवस्थेत होणारे बदल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे रुग्णांची काळजी घेतली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पी.के. ग्रँट यांनी त्यांचे स्वागत आणि सन्मान केला. 
 
उपस्थितांना संबोधताना वि. मुरलीधरन म्हणाले, मला रुबी हॉल क्लिनिकची आरोग्य  व्यवस्था पाहून आनंद झाला. रुग्णांची काळजी घेण्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील काळजी घेण्यात आली आहे. मी जगभरात जिथे जातो तिथे रुग्णालयांना आणि परिचारिका किंवा आरोग्य सेवकांना जरूर भेट देतो. त्याच्या समस्या जाणून घेतो आणि भविष्यात कशाप्रकारे अद्यावत उपकरणांसोबत जुळवून घेत काम करता येईल याची माहिती देतो. आणि त्यांनी स्वतःच्या काळजी घेण्या बद्दल अवश्य सांगतो. कारण विशेषतः कोविडच्या काळात परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोलाचे राहिले आहे.  
Edited by :Ganesh Sakpal