गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (11:50 IST)

इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

maharashatra board
राज्यात नुकतेच दहावीचे निकाल जाहीर कारण्यात आले आहे. यंदा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या काळानंतर ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यात काहींना भरघोस यश मिळाले तर काही विद्यार्थी अपयशी झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च -एप्रिल मध्ये घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची संधी देण्यासाठी पुरवणी परीक्षेचं वेळा पत्रक जाहीर केले असून इयत्ता दहावीची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट तर इयत्ता बारावीची सर्वसाधारण आणि द्विलक्षीय विषयांची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 26 ते 8 ऑगस्टदरम्यान, तर बारावीची 20 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान आयोजित केली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिवांनी दिली. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर राज्य मंडळाने पुरवणी आणि श्रेणी सुधारसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जून पासून सुरु केली आणि दहावी साठी पुरवणी आणि श्रेणी सुधार अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जून पासून सुरु होणार आहे. 

पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिकशाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे वेळापत्रक छापील स्वरूपात देण्यात येईल.