गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (09:30 IST)

पुण्यातील चऱ्होलीत स्कूल बसचा अपघात, सुदैवाने विद्यार्थी बचावले

School bus accident
पुण्याच्या चऱ्होली येथे एका स्कूल बसचा अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या बस मध्ये 70 विद्यार्थी होते. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आणि सुदैवाने विद्यार्थी बचावले.

सदर घटना गुरुवारी दुपारी 3:45 वाजता आळंदी-मरकळ रोड ने एका ज्युनिअर कॉलेजची बस 70 विद्यार्थ्यांना घेऊन जाताना चऱ्होली येथे दाभाडे सरकार चौक जवळ इंद्रायणी नदीच्या पुलावर जाऊन बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. पुलाचा कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली. 

अपघाताचे समजतातच स्थनिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत  बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बस मधून बाहेर काढले. 

माजी महापौर नितीन काळजी यांनी घटनास्थळी धाव घेत स्कूल बस क्रेनच्या साहाय्याने वर काढली. अपघातामुळे पुलावर वाहतूक कोंडी झाली. स्थानिकांनी  प्रसंगावधान राखून मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने या अपघातात सर्व विद्यार्थी बचावले. 
Edited by - Priya Dixit