1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. School bus with students stuck on a well in Pune

पुण्यात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस विहिरीच्या काठावर घसरून अडकली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

School bus
पुण्यातील वडकी हडपसर-सासवड रोड येथे मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस सुमारे ४० विद्यार्थ्यांसह विहिरीच्या काठावर घसरून अडकली. बसचा तोल बिघडल्याने ती विहिरीत कोसळण्याच्या अवस्थेत होती, पण सुदैवाने पूर्णपणे पडली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.
 
पुण्यातून अत्यंत चिंताजनक आणि थरकाप उडवणारी बातमी आहे. पुण्यातील वडकी परिसरातील पांडवनगर येथे ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस विहिरीत कोसळता कोसळता थोडक्यात बचावली असून मोठा अनर्थ टळला आहे.  सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
 
ही धक्कादायक घटना १७ जून रोजी शाळा सुटल्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सर्व विद्यार्थी पूर्णपणे सुरक्षित आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील हडपसर-सासवड रोडवरील वडकी येथील पांडवनगर परिसर.शाळा आणि बस: ही बस मोडक इंटरनॅशनल स्कूलची होती, ज्यामधून सुमारे ४० चिमुकले प्रवास करत होते. अंतर्गत रस्त्यावरील एका तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. प्राथमिक आरोप आणि दाव्यानुसार, बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता.  अनियंत्रित झालेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ४० फूट खोल विहिरीच्या दिशेने गेली. बसने विहिरीचा सुरक्षा कठडा तोडला, परंतु विहिरीभोवती असलेल्या मजबूत लोखंडी जाळीमुळे बस विहिरीच्या काठावरच अडकली आणि हवेत लटकली.
तसेच बस अडकल्यानंतर मुलांनी घाबरून आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून एका धाडसी महिलेने आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील मदतनीसाने प्रसंगावधान राखत तातडीने बसच्या काचा फोडल्या आणि सर्व ४० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि क्रेनच्या साहाय्याने लटकलेली बस बाजूला करण्यात आली.  
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा