शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (08:21 IST)

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेनं शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाची माहिती दिली.  येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल आणि त्याआधी पालकांशी चर्चा केली जाईल, असं मोहोळ म्हणाले. पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील असाच निर्णय घेतला आहे. 
 
वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत, असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आले.