सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. शिंदे हे मूळचे श्रीरामपूरचे असून कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वकिली सुरु केली. सामान्य नागरिकांना ते सोप्या भाषेत कायदा समजावून सांगायचे.
सोमवारी सिद्धार्थ शिंदे हे नेहमीप्रमाणे कामासाठी न्यायालयात गेले असता त्यांना भोवळ आली आणि ते कोसळले. त्यांना तातडीनं दिल्ली एम्स रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचाराधीन असताना त्यांचे हृद्य बंद पडले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव दिल्लीवरून पुण्यात त्यांच्या राहत्या घरी आणणार आहे. दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
Edited By - Priya Dixit